Gadchiroli Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ वर्षांच्या कारावासासह १० हजाराचा दंड

आरमोरी शहरातील एका भागात घडली होती घटना
Crime Case
Crime News Pudhari
Published on
Updated on

गडचिरोली : आरमोरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी मंगेश मोहन दुमाने (रा. ताडूरवार नगर, आरमोरी) याला ३ वर्षांच्या सक्त कारावासाची तसेच १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांनी दिला.

३० ऑगस्ट २०२३ रोजी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र प्रकरण क्र. ८७/२०२३ मध्ये पीडिता, फिर्यादी, पंच व अन्य साक्षीदारांच्या साक्षी तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता/संबंधित कायद्यांतील लागू कलमांखाली दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला ३ वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साक्षीदारांशी समन्वय साधून प्रकरणाच्या प्रभावी सुनावणीसाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news