Gadchiroli News | मंगळसूत्र गहाण ठेवून जखमी शेतकऱ्याने जिल्हा शल्य चिकित्सकास दिले हजारो रुपये

चामोर्शी तालुक्यातील लसणपेठ येथील गरीब शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Gadchiroli Civil Surgeon
Gadchiroli Civil Surgeon Pudhari
Published on: 
Updated on: 

Gadchiroli Civil Surgeon

गडचिरोली : रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर वनविभागाकडून पाच लाखांची मदत मिळावी, म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची पाळी एका गरीब शेतकऱ्यावर आली. उत्तम गोविंद मंडल असे पीडित शेतकऱ्याचे नाव असून, तो चामोर्शी तालुक्यातील लसणपेठ येथील रहिवासी आहे.

उत्तम मंडल हे रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. सुरुवातीला गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, नंतर गडचिरोलीच्या खासगी रुग्णालयात व पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात मंडल यांनी उपचार घेतले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागाकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाते. त्याअनुषंगाने मंडल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली.

Gadchiroli Civil Surgeon
Gadchiroli Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार!

मात्र, तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी त्यांना सुरुवातीला ६० हजार व नंतर ५० हजार रुपयांची मागणी केली. गरीब असल्याने मंडल यांनी विनंती केली असता डॉ. लहाडे यांनी ५० हजारांवर तडजोड केली. परंतु वनविभागाकडून मोठी मदत मिळेल, या आशेने उत्तम मंडल यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून ४५ हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाले. ते त्यांनी वनविभागाला सादर केले.

परंतु पाच महिने लोटूनही वनविभागाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. पुढे मंडल यांनी पैसे परत मिळावेत म्हणून डॉ.लहाडे यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि आपण दिलेले पैसे व्याजासह परत मिळवून द्यावेत, अशी मागणी उत्तम मंडल यांनी केली आहे. सध्या एका प्रकरणात शासनाने डॉ.वर्षा लहाडे यांना निलंबित केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

अनेक जखमींना वनविभागाने नाकारली मदत

दरम्यान उत्तम मंडल यांच्यासारख्या अनेक जखमी नागरिकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन ते वनविभागाकडे सादर केले. परंतु वनाधिकाऱ्यांना पत्राबाबत साशंकता असल्याने त्यांनी ते प्रमाणपत्र नाकारुन कोणालाही पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली नाही. एकूणच जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेले पैसेही गेले आणि वनविभागाकडून वैद्यकीय मदतही मिळाली नाही, अशा दुविधेत गरीब नागरिक सापडले आहेत.

Gadchiroli Civil Surgeon
Gadchiroli Land Protest | गडचिरोलीतील जमिनी प्रक्रियेविरोधात उपोषण, चक्काजाम, ठिय्या आंदोलनाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : महेंद्र ब्राम्हणवाडे

डॉ.लहाडे यांना बडतर्फ करा: कुणाल पेंदोरकर

दरम्यान, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना सेवेतून बडतर्फ करावे, तसेच कनिष्ठ लिपिक वंदना लाडे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेदोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डॉ.लहाडे यांनी रुग्णांना किरकोळ जखम असल्याने मदत मिळणार नाही. गंभीर जखमी असल्याचे प्रमाणपत्र हवे असेल तर पैसे मोजावे लागतील, असा दम देत पैसे वसूल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन प्रमाणपत्र दिले, असा आरोप कुणाल पेंदोरकर यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news