Gadchiroli Land Protest | गडचिरोलीतील जमिनी प्रक्रियेविरोधात उपोषण, चक्काजाम, ठिय्या आंदोलनाकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : महेंद्र ब्राम्हणवाडे

लोहप्रकल्प आणि विमानतळासाठी होणारे जमिनीचे अधिग्रहण, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, रिक्त पदे अशा प्रश्नांनी शेतकरी त्रस्त
Gadchiroli Land Protest
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची पत्रकार परिषद Pudhari
Published on: 
Updated on: 

Gadchiroli Land Protest

गडचिरोली : लोहप्रकल्प आणि विमानतळासाठी होणारे जमिनीचे अधिग्रहण, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, रिक्त पदे अशा प्रश्नांनी शेतकरी त्रस्त असताना मुख्यमंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे नऊ महिन्यांपासून पाठ फिरवली आहे. देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे सर्वांत अपयशी पालकमंत्री आहेत, असा घणाघात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील आणि गडचिरोली तालुक्यातील गुरवळा परिसरातील शेतकरी प्रस्तावित लोहप्रकल्प आणि विमानतळासाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या प्रक्रियेविरोधात उपोषण, चक्काजाम, ठिय्या आंदोलन यासारखे अस्त्र वारंवार उपसत आहेत. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ९ महिन्यांपासून गडचिरोलीत पाय ठेवला नाही. महसूलमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी येतात; मात्र, उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी गडचिरोलीत राहून भाजपमधील गटबाजी कमी करण्यात वेळ घालवत आहेत. परंतु तेही कधी शेतकऱ्यांशी बोलत नाहीत, अशी टीका ब्राम्हणवाडे यांनी केली.

Gadchiroli Land Protest
Gadchiroli News | नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अडीचशेहून अधिक तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. परंतु गडचिरोली जिल्ह्यात केवळ दोनच तालुक्यांचा त्यात समावेश केल्याने १० तालुक्यांतील लाखो शेतकऱ्यांवर अन्याय झाला. जमीन अधिग्रहण, वाघ, रानटी हत्तींमुळे होणारे जीवित व वित्तीय नुकसान, स्मार्ट मीटरमुळे येणारे अवाढव्य बील, ढासळलेली आरोग्य यंत्रणा, भंगार बसेस याबाबत मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. त्यामुळे 'आपण बेपत्ता पालकमंत्र्यांना पाहिले का?', असे बॅनर लावण्याची वेळ आली आहे. फडणवीस हे सर्वांत अपयशी पालकमंत्री आहेत, असेही ब्राम्हणवाडे म्हणाले.

पत्रकार परिष्रदेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रभाकर वासेकर, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, दिवाकर निसार, अनिल कोठारे, प्रमोद भगत, दीपक ठाकरे यांच्यासह पीडित शेतकरी उपस्थित होते.

Gadchiroli Land Protest
Gadchiroli News : मसेलीच्या आश्रमशाळेतून मध्यरात्री दोन विद्यार्थिनी बेपत्ता!

१ डिसेंबरपासून नागपूर अधिवेशनावर पैदल मार्च

जमीन अधिग्रहणाचा आदेश भाऊबिजेपर्यंत रद्द केला नाही, तर येत्या १ डिसेंबरपासून गडचिरोली आणि शेजारच्या चंद्रपूर जिल्हृयातील हजारो शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पैदल मार्च काढतील, असा इशारा ब्राम्हणवाडे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news