Gadchiroli Farmer Protest | जीव गेला तरी स्टील प्रकल्पासाठी जमीन देणार नाही: मुंडन आंदोलन करुन १४ गावांतील शेतकऱ्यांचा निर्धार

चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित जेएसडब्लू स्टील प्रकल्पासाठी सुपीक जमिनी अधिग्रहीत करण्यासंदर्भात प्रशासनाने काढलेला आदेश रद्द करण्याची मागणी
JSW Steel Gadchiroli Project
शेकडो नागरिकांनी आज (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध Pudhari
Published on
Updated on

JSW Steel Gadchiroli Project

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित जेएसडब्लू स्टील प्रकल्पासाठी सुपीक जमिनी अधिग्रहीत करण्यासंदर्भात प्रशासनाने काढलेला आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेकडो नागरिकांनी आज (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला. जीव गेला तरी जमीन देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुमारे ३ हजार ५०४ हेक्टर जमीन जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासनाने ११ फेब्रुवारीला एक आदेश जारी केला. त्यानुसार कार्यवाही झाली तर सर्व शेतकरी भूमिहीन होतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

JSW Steel Gadchiroli Project
Gadchiroli Farmers Protest | भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली जमीन अधिग्रहण आदेशाची होळी 

त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी बचाव जनआंदोलन समिती गठित केली. महिनाभरापासून या समितीच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत. परंतु प्रशासन चर्चेसाठी तयार नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी आज संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन करुन प्रशासनाला धारेवर धरले. जीवनात आपण प्रथमच शेतकऱ्यांसाठी मुंडन केल्याचे सांगून मुरलीधर महाराज यांनी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी स्टील प्रकल्पासाठी देणार नाही, असा इशारा दिला.

या आंदोलनाला पाठिंबा देत अनेक काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांच्यासह परिसरातील सुमारे दोन हजार पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. दडपशाहीने जमीन अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

JSW Steel Gadchiroli Project
Gadchiroli Protest | वाघाच्या हल्ल्यांमुळे नागरिक संतप्त, देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन, तब्बल दोन तास वाहतूक ठप्प

प्रसंगी न्यायालयातही धाव घेऊ: महेंद्र ब्राम्हणवाडे

आ.अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. खा.डॉ.नामदेव किरसान यांनीही पत्राद्वारे शासनाचे लक्ष वेधले. तरीही प्रशासन ऐकत नसेल तर हा लढा दिल्लीपर्यंत नेऊ. प्रसंगी न्यायालयातही धाव घेऊ, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news