Gadchiroli Crime | इन्स्टावरुन ओळख, समलिंगी संबंध, गडचिरोलीत The End; 32 वर्षांच्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ही घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ घडली
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

गडचिरोली : समाजमाध्यमावरुन ओळख झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातील दोन युवकांमध्ये प्रस्थापित झालेले समलैंगिक संबंध अल्पावधीतच खुनात परिवर्तीत झाले. समलैंगिक संबंधाच्या आहारी गेलेल्या एका युवकाने आपल्या पार्टनरची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ रविवारी (दि .३१) सकाळी घडली.

Murder Case
Amravati Murder | दर्यापुरात भरदिवसा मित्राकडून मित्राची चाकू भोसकून हत्या; दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सतीशकुमार जगदीशप्रसाद निसाद (वय :३२, रा.नागेपल्ली, ता.अहेरी) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवक सूरज हलदार (वय : ३०, रा. मिरगन, जि. नबरंगपूर, ओडिशा) यास अटक केली. आरोपी सूरज हलदार हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी आहे. नागेपल्ली येथे गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या सतीशकुमार निसाद याच्याशी सूरजची इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली. या ओळखीचे पुढे मैत्रीत आणि त्यानंतर समलैंगिक संबंधामध्ये रुपांतर झाले.

Murder Case
Gadchiroli Murder | कुऱ्हाडीने वार करून १७ वर्षीय मुलाचा निर्घृण खून, मित्रानेच काढला मित्राचा काटा!

दोन दिवसांपूर्वी सूरज हलदार हा ओडिशावरुन सतीशकुमारला भेटण्यासाठी नागेपल्लीला आला. माझी तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, असे सूरजने सतीशकुमारला म्हटले. परंतु सतीशकुमारने आपण विवाहित असल्याचे सांगून त्यास लग्न करण्यास नकार दिला. यामुळे सूरज अस्वस्थ झाला. रविवारी सकाळी सतीशकुमार आपल्या कारने सूरजला ओडिशाला सोडून देणार होता.

Murder Case
Hingoli Crime News : कळमनुरीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, चौघांना बेड्या

दोघेही कारने जात असताना छत्तीसगड सीमेजवळील देवदा गावाजवळ दोघांमध्ये वाद झाला. त्यात रागाच्या भरात सूरजने चाकूने सतीशकुमारवर वार केले. यामुळे गंभीर जखमी होऊन सतीशकुमारचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिक जमा झाले. आरोपी सूरज तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. हालेवारा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news