Gadchiroli News | अखेर माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अहेरी येथील इमारतीवर बुलडोजर

Aheri Encroachment Removal | काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथे उभारलेल्या अनधिकृत इमारतीवर नगर पंचायतीने बुलडोजर चालवला
Former ZP President building demolished
Former ZP President building demolishedPudhari
Published on
Updated on

Former ZP President building demolished

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथे उभारलेल्या अनधिकृत इमारतीवर नगर पंचायतीने बुलडोजर चालवला आहे. न्यायालयात अपिल करण्याची मुदत संपताच ही कारवाई केल्याने इमारत जमीनदोस्त झाली आहे.

अहेरी येथे गडअहेरी मार्गावर अजय कंकडालवार यांनी भूखंड खरेदी करून त्यावर इमारत बांधकामासाठी परवानगी मागितली होती. मात्र, नियमानुसार राज्य महामार्गापासून आवश्यक असलेले २० मीटर किंवा रस्त्याच्या हद्दीपासून ४.५० मीटर अंतर सोडण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नगरपंचायतीने परवानगी नाकारली. तरीही कंकडालवार यांनी बांधकाम सुरूच ठेवले. पाहतापाहता चार मजली इमारत उभी झाली.

Former ZP President building demolished
Gadchiroli News | लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेतील ६० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

यासंदर्भात नगर पंचायत प्रशासनाने कंकडालवार यांना अनेकदा नोटिसा बजावल्या. मात्र, कंकडालवार यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करताना अहेरी येथील न्यायालयाने इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. पुढे या आदेशाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती देत कंकडालवार यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली.

परंतु त्यांनी विहित मुदतीत उच्च न्यायालयात अपिल केले नाही. त्यामुळे अहेरी न्यायालयाचा मूळ निवाडा कायम राहिल्याने इमारत पाडण्याचा निर्णय नगर पंचायत प्रशासनाने घेतला.

Former ZP President building demolished
Gadchiroli News | पायपीट थांबणार : आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बससेवा

आज सकाळी चोख पोलिस बंदोबस्तात नगर पंचायतीचे कर्मचारी जेसीबी व बुलडोजरसह दाखल झाले. त्यांनी चार मजली इमारत जमीनदोस्त केली. यावेळी शेकडो नागरिक ही कारवाई बघण्यासाठी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news