गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठातील अपहार प्रकरणी चार कर्मचारी निलंबित

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठातील अपहार प्रकरणी चार कर्मचारी निलंबित

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : येथील गोंडवाना विद्यापीठात तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या चारही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (दि.७) विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. महेशकुमार उसेंडी, अमोल रंगारी, अमित जांभुळे आणि प्रिया पगाडे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून, ते तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत.

गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी १ कोटी ४६ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. तपासाअंती पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक्‍ केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महेशकुमार उसेंडी हा या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार आहे. विद्यापीठात विविध प्राधिकरणाचे पदाधिकारी वेगवेगळ्या कामासाठी ये-जा करत असतात. या पदाधिकाऱ्यांना प्रवास भत्ता मिळतो. त्यांच्या प्रवास भत्त्याची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणे अनिवार्य आहे. परंतु महेशकुमार उसेंडी याने या पदाधिकाऱ्यांच्या प्रवास देयकांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा न करता ती स्वत:च्या खात्यात जमा केली. ही बाब लक्षात येताच प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली. काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चारही कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यानंतर आज विद्यापीठ प्रशासनाने चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news