

Gadchiroli Municipal Polls
गडचिरोली : नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत आरमोरी, वडसा आणि गडचिरोली नगरपरिषदेत काल शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी 70.60 टक्के मतदान नोंदविण्यात आले. यात आरमोरी नगरपरिषद मतदार संघात 72.85 टक्के, वडसा(देसाईगंज) 72.48 तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात 68.26 टक्के मतदान झाले आहे.
आरमोरी मतदारसंघात 11 हजार 792 पुरुष आणि 11 हजार 207 महिला असे एकूण 22 हजार 999 मतदार होते त्यापैकी 8271 पुरुष आणि 8484 महिला असे एकूण 16 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वडसा मतदारसंघात एकूण 12 हजार 763 पुरुष मतदार व 13589 महिला असे एकूण 26 हजार 352 मतदार होते. यातील 9449 पुरुष मतदार व 9652 स्त्री मतदार असे एकूण 19 हजार 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली नगरपरिषद मतदारसंघात एकूण 21 हजार 167 पुरुष मतदार, 22 हजार 343 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 43 हजार 513 मतदार होते. यातील 14593 पुरुष मतदार, 15107 महिला मतदार तर 2 तृतीयपंथी असे एकूण 29 हजार 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात एकूण 45 हजार 722 पुरुष मतदार, 47 हजार 139 महिला आणि 3 तृतीयपंथी असे एकूण 92 हजार 864 मतदार होते. त्यापैकी 32313 पुरुष, 33243 महिला व 2 तृतीयपंथी असे एकूण 65 हजार 558 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.