Gadchiroli - Bhandara Expressway|गडचिरोली-भंडारा ९४ किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गास मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रवासाचे अंतर २३ किलोमिटरने होणार कमी : ५३४.४६ कोटींची तरदूत
Gadchiroli - Bhandara Expressway|
Gadchiroli - Bhandara Expressway|गडचिरोली-भंडारा ९४ किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गास मंत्रिमंडळाची मंजुरीPudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली : गडचिरोली-भंडारा या द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीस आणि हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पामुळे गडचिरोली ते भंडारा प्रवासाचे अंतर २३ किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी सव्वा तासावर येईल.

Gadchiroli - Bhandara Expressway|
Gadchiroli Naxal Encounter | गडचिरोली: चकमकीत चार नक्षलवादी ठार; मृतांमध्ये १ पुरुष, ३ महिलांचा समावेश

नागपूर-मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर आणि कालावधी कमी करण्यासाठी हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग पूर्ण करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा-गडचिरोली या प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस २७ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता या महामार्गांतर्गत नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखंडा इंटरचेंजपासून राज्य महामार्ग ५३ वरील कोकणागडपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे आणि बोरगाव इंटरचेंज ते राज्य महामार्ग ३५३ ड वरील रणमोचनपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे अशा एकूण ९४.२४१ किलोमीटरच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

Gadchiroli - Bhandara Expressway|
Gadchiroli News : राज्याचा विकास होत नसून विनाशाकडे वाटचाल, माकपची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यापोटी ५३४.४६ कोटी आणि व्याजापोटी ३९६.६९ कोटी असे एकूण ९३१.१५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news