गडचिरोली : अज्ञाताकडून गोळी झाडून तरुणाचा खून

गडचिरोली : अज्ञाताकडून गोळी झाडून तरुणाचा खून
Published on
Updated on

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात इसमाने एका युवकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे घडली. किशोर कुडयामी (वय २३) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री किशोर कुडयामी याची बहीण लघुशंकेसाठी उठली असता तिला घराबाहेर कुणीतरी बंदूक घेऊन उभा असल्याचे दिसले. तिने ही बाब किशोरला सांगितल्यानंतर तो टॉर्च घेऊन बाहेर आला. मात्र, काही क्षणातच त्याने किशोरवर गोळी झाडली. यात तो जागीच गतप्राण झाला. त्याची हत्या कुणी आणि कशासाठी केली. या हत्येत नक्षल्यांचा हात आहे किंवा कसे, याविषयीचा उलगडा पोलीस तपासानंतरच होईल. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news