IPL Team MI Franchise : मुंबई इंडियन्सचे दोन नवीन संघ लाँच, यूएई आणि द. आफ्रिका लीग गाजवणार | पुढारी

IPL Team MI Franchise : मुंबई इंडियन्सचे दोन नवीन संघ लाँच, यूएई आणि द. आफ्रिका लीग गाजवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे जेतेपद पाचवेळा जिंकणारी मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझी आता परदेशी लीगमध्येही चमक दाखवणार आहे. एमआय फ्रँचायझीचे मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने युएई (UAE) आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 (T20) लीगमध्ये दोन संघ विकत घेतले आहेत. (IPL Team MI Franchise)

या संघांना खरेदी करण्याची बातमी जुनी आहे, पण नवीन गोष्ट अशी आहे की एमआय फ्रँचायझीने या दोन संघांची नावे आणि लोगो जाहीर केले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाव आणि लोगोही लॉन्च केला आहे. (IPL Team MI Franchise)

एमआय फ्रँचायझीने युएईच्या टी 20 लीगमध्ये त्यांच्या संघाला ‘MI Emirates’ असे नाव दिले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीगमध्ये संघाचे नाव ‘MI केपटाऊन’ असे ठेवण्यात आके आहे. हे दोन्ही संघ आणि आयपीएलचे मुंबई इंडियन्स हे सर्व एकाच एमआय कुटुंबाचे भाग आहेत. ही दोन्ही नावे त्या-त्या संघाच्या चाहत्यांसाठी समर्पित करण्यात आली आहेत. (IPL Team MI Franchise)

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएल विजेतेपदे जिंकले

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. ही सर्व विजेतेपदे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत. गेल्या 2022 च्या हंगामात मुंबई संघाने सर्वात वाईट कामगिरी केली आणि हा संघ शेवटच्या क्रमांकावर घरसला. पण आता चाहत्यांना आशा आहे की पुढच्या म्हणजे 2023 च्या मोसमात मुंबई सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल.

Back to top button