गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२.४५ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरातील तमंदला गावापासून जंगलात पाच किलोमीटर अंतरावर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३.८ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरोंचा तालुक्यातील काही गावांना ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू तमंदला गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जंगलात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले आहेत. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर बांधण्यात आलेले मेडीगडृडा धरण या भूकंपाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सिरोंचा तालुक्याला भूकंपाचे धक्के बसण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षी ३१ ऑक्टोबरलाही ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे बसले होते. यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत.
हेही वाचा :