चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ५५.११ टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ५५.११ टक्के मतदान

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आज (दि.१९) सुरू असलेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५५.११ टक्के मतदान झाले असून आणखी एक तासाच्या मतदानाची टक्केवारी येणे बाकी आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.४८ टक्के मतदान पार पडले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजतापर्यंत ७०-राजुरा ५९.१४ टक्के, ७१-चंद्रपूर ४८.२० टक्के, ७२-बल्लारपूर ५९.०६ टक्के, ७५-वरोरा ५७.५६ टक्के, ७६-वणी ५८.८७ टक्के, ८०-आर्णी ४९.७० टक्के मतदान पार पडले. आर्णी व व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ५० टक्याच्या खाली टक्केवारी आहे. तर उर्वरित विधानसभा क्षेत्रात साठ टक्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी आहे. उर्वरित तासभराच्या मतदानाची टक्केवारी येणे बाकी आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news