Lok Sabha Election 2024: प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का, काँग्रेस कार्यकर्ते भडकले

Lok Sabha Election 2024: प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का, काँग्रेस कार्यकर्ते भडकले
Published on
Updated on

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आज दुपारी 3 वाजतापर्यंत फक्त 43.48 टक्केच मतदान झाले. चंद्रपूर विधानभा क्षेत्रवगळता उर्वरित क्षेत्रात चाळीसच्या वर मतदानाची टक्केवारी आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यामध्ये 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत फक्त 7.44 टक्के मतदान झाले. 11 वाजेपर्यंत 18.94, 1 वाजेपर्यात 3.96 तर दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान झाले. Lok Sabha Election 2024

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रातील 70-राजुरा 43.25 टक्के, 71-चंद्रपूर 37.94 टक्के, 72-बल्लारपूर 47.74टक्के, 75-वरोरा 44.59 टक्के, 76-वणी 47.50 टक्के, 80-आर्णी 41.40 टक्के मतदान पार पडले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये अन्य विधानसभा क्षेत्रापेक्षा मतदानाची टक्केवारी कमी आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभाक्षेत्रात 2118 मतदान केंद्रावर मतदानाचा प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 18 लाख 37 हजार 906 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. परंतु दुपार पर्यंत 43.48 टक्के मतदान झाल्याने सायंकाळच्या वेळात मतदार मतदानासाठी घराबाहेर येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलच्या शिक्का

प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का असल्याचे लक्षा येताच काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच भडकले. मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आला. त्यामुळे हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच या प्रकाराचा निषेध केला. भाजपचे उमदेवार मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत पक्षपात केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा प्रश्न करून कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news