Chandrapur news: वरोऱ्यात बॅनर लावताना विजेचा धक्का; २६ वर्षीय मजुराचा मृत्यू

वरोरा शहरातील जाजू हॉस्पिटल परिसरात बॅनर लावण्याचे काम करताना विजेचा धक्का बसून एका तरुण मजुराचा मृत्यू झाला.
Warora Banner Installation Accident
Warora Banner Installation AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

Chandrapur news

चंद्रपूर : वरोरा  शहरातील जाजू हॉस्पिटल परिसरात बॅनर लावण्याचे काम करताना विजेचा धक्का बसून एका तरुण मजुराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जाहिरात फलक लावण्याच्या कामातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Warora Banner Installation Accident
Chandrapur News : वरोऱ्यात ६.५१ कोटींच्या टाऊन हॉलच्या भिंतींना तडे!

मृत तरुणाची ओळख संदीप ज्ञानेश्वर गुळघे (वय २६, रा. सोनेगाव, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर) अशी झाली आहे. बॅनर लावण्यासाठी विद्युत डीपीच्या खांबावर काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावण्यासाठी कामगारांकडून उंचीवर तसेच विद्युत यंत्रणेजवळ काम करून घेतले जाते. अशा कामांमध्ये आवश्यक सुरक्षा उपकरणे, योग्य खबरदारी आणि सुरक्षित कार्यपद्धती पाळली जाते का, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

या दुर्घटनेप्रकरणी संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी, निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि मृत मजुराच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांनी केली आहे.

Warora Banner Installation Accident
Chandrapur news: वरोरा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.