चंद्रपूर : पोंभूर्णा येथील फिस्कुटी शेतशिवारात वाघिणीचा मृत्यू; वनविभागात खळबळ

file photo
file photo

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील फिस्कुटी शेतशिवारात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज मंगळवारी (दि.१२) रोजी सकाळी काही महिला शेतात निंदनासाठी गेल्या असत्या त्यांना वाघीण मृत्तावस्थेत दिसून आली.

माहितीनुसार, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील आणि मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील जगदिश गावतुरे यांच्या शेतात आज मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास काही महिला निंदन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना शेतात एक वाघीण मृत्तावस्थेत दिसून आली. महिलांनी याची माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फिस्कुटीचे सरपंचामार्फत पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ही माहिती दिली.

माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी पाहणी केली असता वाघीण मृत्तावस्थेत असल्याचे आढळून आले. वाघीण दोन ते अडीच वर्षाची होती. वन विभागाने वाघीणीचा मृत्तदेह ताब्यात घेतला आहे.

रविवारी सायंकाळी मूल-सिंदेवाही मार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर त्यापूर्वी बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून दुरावल्याने तिच्या तीन पिल्लांचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा वाघिणीचा मृत्तदेह आढळून आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news