Children Drowning Incident | सिंदेवाही तालुक्यात नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Emotional Incident Mother Witness | आईच्या डोळ्यासमोरच घडली दुर्दैवी घटना; खातगावात पसरली शोककळा
Children Drowning Incident
सिंदेवाही तालुक्यात नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

12 Year Old Boy Death

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथील 12 वर्षीय बालकाचा बोकडोह नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 6 ऑगस्ट) सकाळी घडली. ही घटना त्याच्या आईसमोरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत बालकाचे नाव लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार (वय 12) रा. खातगाव असे आहे.

आज बुधवारी सकाळी लोकेश आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गावाजवळील बोकडोह नदीवर गेला होता. आई कपडे धुत असताना लोकेश अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना त्याच्या आईच्या डोळ्यासमोर घडल्याने ती स्तब्ध झाली.

Children Drowning Incident
Chandrapur Crime | जुनोना चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह ३ जण अटकेत

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे पाठवण्यात आला.

Children Drowning Incident
Chandrapur Aadhaar card News: ओळख असूनही 'अनोळखी': निष्क्रिय आधारमुळे 5 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात; शिष्यवृत्ती रखडली, उच्च शिक्षण संकटात

लोकेशच्या आकस्मिक मृत्यूमुळे वरखडवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खातगाव गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news