चंद्रपूर : येरखडा येथे सरपंच व ऑपरेटरला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले

ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले
ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील येरखेडा गावातील सरपंच संजय गेडाम व ऑपेरेटर मितेश या दोघांना काल शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असताना ग्रामपंचायतचे सदस्य सुधाकर नन्नावरे यांना कोंडल्याची घटना उघडकीस आली आले. सुमारे तीन तासानंतर पोलिसांनी कुलूप तोडून त्यांना बाहेर काढले. गावात एक सभागृह मंजूर असून त्या सभागृहाचे बांधकाम करू नये, अशी मागणी सदस्य करीत आहे. त्याच कारणावरून सरपंचाला कोंडल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या 

चिमूर तालुक्यातील भिशी चिमूर मार्गावर येरखडा गाव वसलले आहे. काल शनिवारी (दि. ४) रोजी सकाळी सरपंच संजय गेडाम व ऑपेरेटर मितेश हे दोघेही ग्रामपंचायत कार्यालयात काम करित बसले होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नन्नावरे हे कार्यालयात आले. आणि कार्यालयातून बाहेर जाताना कुलूप लावून त्यांना कोंडले.

काही वेळाने माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे काही कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाकडे आले असता ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप लावलेला दिसले. ग्रामपंचायत कर्मचारी हे बाहेर बसलेला होता. याबाबत विलास डांगे यांनी सविस्तर माहिती घेतली असता सरपंच यांना आतमध्ये कोंडून ठेवले असल्याची माहिती समोर आली. त्यांनी भिसी पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच भिसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन जंगम येरखेडा ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात पाहणी केली आणि कुलूप तोडून सरपंच आणि ऑपरेटरला बाहेर काढले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे उपस्थित होते.

सरपंच गेडाम यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नन्नावरे यांच्याविरोधात भिसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. येरखडा गावात एक सभागृह मंजूर करण्यात आले आहे. सदर कामाचे बांधकाम सुरू करण्यात येवू नये, या मागणीसाठी सदस्याने असे केल्याची माहिती समोर आली. पुढील तपास ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news