संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रामनाथ मुरलीधर गुंजाळ हे मतदार मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र आज रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान असल्याने या निवडणुकीत त्यांचा पुतण्या उमेदवार असल्यामुळे आपले मत वाया जाऊ नये म्हणून त्यांनी रुग्णवाहिकेमधून घुलेवाडी येथील आनंदवन विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि पुन्हा रुग्णवाहिकेतूनच रुग्णालयात दाखल झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 4 लाख 39 हजार 647 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामपंचायतींच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती.
संगमनेर : 6 (26) कोपरगाव : 17 (80), श्रीरामपूर : 13 (61), राहाता : 12 (62), राहुरी : 21 (86), नेवासा : 16 (65), नगर : 6 (30), पारनेर : 7 (28), पाथर्डी : 14(46), शेवगाव : 27 (107), कर्जत : 6 (17), जामखेड : 3(12), श्रीगोंदा : 9 (49), अकोले : 21(63).