Chandrapur crime : धान चोरी प्रकरणाचा उलगडा; गोविंदपूर येथील तिघांना अटक

सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मिळाला महत्त्वाचा धागा, मिनी मेटॅडोर आणि चोरीतील साडेबारा हजार रुपये जप्त
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मांगरुळ व कीटाळी (बोर.) येथील शेतकऱ्याचे २१ धानाची पोती चोरीला गेल्याच्या गाजलेल्या प्रकरणाचा नागभीड पोलिसांनी छडा लावत गोविंदपूर येथील तीन आरोपींना अटक केली आहे. कीटाळी (बोर.) ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित मिनी मेटॅडोर रात्री दीड वाजताच्या सुमारास कैद झाल्यानंतर तपासाला दिशा मिळाली. आरोपींनी चोरीची कबुली दिली असून चोरीसाठी वापरलेला मिनी मेटॅडोर आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Crime News
Kalyan gangwar | कल्याणमध्ये टोळीयुद्धाचा भडका, प्रेम गुंडा - बुंदी टोळी आमनेसामने! चार आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगरुळ व कीटाळी (बोर.)  येथील शेतकरी यादव देवराव किन्नाके व अन्य शेतकरी यांनी मळणी केल्यानंतर मांगरुळ गावाजवळील रस्त्यावर  वाळवायला ठेवलेली होती. घाण वाढल्यानंतर विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी रस्त्यालगत पोत्यात भरून ठेवली होती. २१ धानाची पोती आणि ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर नागभीड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान याच मार्गावरील कीटाळी (बोर.) ग्रामपंचायतीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास एक संशयित मिनी मेटॅडोर जाताना दिसून आला. याच वाहनाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि अखेर चोरीचा उलगडा करण्यात यश मिळविले. या प्रकरणात गोविंदपूर येथील रुपेश हरी शेंडे (वय ३४), मेघश्याम गोविंदा कामडी (वय २७) आणि प्रदीप मनोहर कामडी (वय २९) यांना अटक करण्यात आली.

Crime News
Jalgaon Crime | अपघाताचा बनाव फसला: रक्त झाकण्यासाठी टाकलेल्या मातीवरून खुनाचा छडा; तिघांना अटक

पोलिस तपासात आरोपी रुपेश शेंडे याने धक्कादायक माहिती दिली. त्याच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याचा बहाणा करून त्याने सोनापूर येथील एका मित्राकडून मिनी मेटॅडोर मागविला. मात्र पत्नीला दवाखान्यात नेण्याऐवजी त्या वाहनात काड्या भरून तो गोविंदपूर–मांगरुळ मार्गे ब्रह्मपुरीजवळील खरबी येथे गेला. तेथे नातेवाईकाकडे काड्या उतरविल्यानंतर परतीच्या प्रवासात मांगरुळ जवळ रस्त्याच्या कडेला वाळवून पोत्यांमध्ये भरून ठेवलेले धान त्याच्या नजरेस पडले. त्याचवेळी धान चोरीचा कट रचण्यात आला. परत येताना रुपेशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने दोन शेतकऱ्यांची एकूण २१ धानाची पोती मिनी मेटॅडोरमध्ये भरून लंपास केली. चोरीनंतर हे धान गोविंदपुर येथील एका शेतकऱ्याला सुमारे २६ हजार रुपयांना विकण्यात आले. संबंधित शेतकऱ्याने ते धान पुढे शासकीय धान खरेदी केंद्रावर विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Crime News
Parbhani Crime | पूर्णा येथे वकिलाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ४५ लाखांच्या खंडणीप्रकरणी तिघे जेरबंद

अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. धान विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी अर्धी रक्कम खर्च केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून साडेबारा हजार रुपये जप्त केले असून चोरीसाठी वापरण्यात आलेला मिनी मेटॅडोरही जप्त केला आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर वाहन सुपूर्दनाम्यावर सोडण्यात आले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक २८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयातून त्यांची जामिनावर सुटका झाली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री गोविंदवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news