Chandrapur FDA Raid | पतंजली मेगा स्टोअरवर FDA ची धडक कारवाई; 45 हजार रुपयांचा औषधसाठा जप्त

मोटापा, दमा, हृदयविकार व तापावर निश्चित उपचाराचे दावे आढळले; भ्रामक जाहिरातीप्रकरणी कारवाई
FDA raid
FDA raid Pudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट परिसरातील पतंजली मेगा स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई करत 45 हजार 970 रुपयांचा औषधसाठा जप्त केला. तपासणीदरम्यान काही औषधांच्या पॅकेजिंगवर मोटापा, दमा, हृदयविकार आणि ताप यांसारख्या आजारांवर निश्चित उपचार होण्याचे दावे करण्यात आल्याचे आढळून आले. हे दावे कायद्याने प्रतिबंधित असल्याने विभागाने ही कारवाई केली.

FDA raid
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पतंजली मेगा स्टोअरमध्ये अचानक तपासणी केली. यावेळी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या काही औषधांच्या वेष्टनांवर विविध गंभीर आजारांवर हमखास उपचार होण्याचे दावे नमूद असल्याचे निदर्शनास आले.

FDA raid
Pimpri Demolition Drive: चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई; चार प्रार्थनास्थळे जमीनदोस्त

FDA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधे आणि जादुई उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, 1954 अंतर्गत अशा प्रकारच्या जाहिराती व दावे करण्यास मनाई आहे. या प्रकारच्या दाव्यांमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असून आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

FDA raid
Sambhajinagar News : प्लास्टिक वापरणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

तपासणीदरम्यान आढळलेल्या अनियमितता गंभीर स्वरूपाच्या असल्याने विभागाने तत्काळ 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला. या प्रकरणात संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती FDA प्रशासनाने दिली.

FDA raid
Railway Encroachment Mumbai: मध्य रेल्वेच्या जागेवर 16 हजार बेकायदा झोपड्यांचा विळखा

या कारवाईमुळे औषधांच्या जाहिराती आणि विक्रीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत व्यापारी व औषध विक्रेत्यांना स्पष्ट इशारा मिळाल्याचे मानले जात आहे. FDA विभागाकडून अशा प्रकारच्या तपासण्या भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news