Sambhajinagar News : प्लास्टिक वापरणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स : २० दिवसांत साडेआठ लाखांची वसुली
sambhajinagar news
प्लास्टिक वापरणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाईfile photo
Published on
Updated on

Municipal Corporation Initiates Penal Action Against Plastic Users

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणे तसेच बायोमेडिकल वेस्टची अयोग्य विल्-हेवाट लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar Accident : मनपाच्या बेफाम टोइंग व्हॅनने आंबे विक्रेत्यासह चार वाहनांना उडवले

१ मेपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत क्लीन स्ट्रीट अॅपच्या माध्यमातून अवघ्या २० दिवसांत तब्बल साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविण्यात येत असून, गरज पडल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १ मेपासून घरगुती व व्यावसायिक कचरा संकलनासाठी नवीन कार्यप्रणाली लागू केली आहे. शहरात ४८० हून अधिक घंटागाड्यांद्वारे नियमित कचरा संकलन सुरू असून अनेक भागांतील नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करून दिला जात आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : मोती कारंजा ते समर्थनगर नाल्यांची सभापतींकडून पाहणी

मात्र, काही भागांत अद्यापही उघड्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, नदीपात्रात कचरा फेकणे तसेच अनधिकृत बॅनर आणि पत्रके टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शहरातील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नागरी मित्र पथकाकडून विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिक विक्रेते, हॉटेल्स, हॉस्पिटल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

आतापर्यंत ५०० हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, काही हॉस्पिटल्सकडून बायोमेडिकल वेस्ट सामान्य कचऱ्यासोबत टाकण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे. मानवी आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या या प्रकारांवर महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून संबंधितांवर दंडासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news