NEET उत्तीर्ण; प्रवेश निश्चित पण एमबीबीएस होण्याचे स्वप्न अपूरेच : दडपणाखाली आलेल्‍या अनुरागनं संपवलं आयुष्य

सिंदेवाहीतील नवरगावात शोकांतिका: वैद्यकीय शिक्षणाऐवजी व्यवसाय करायची इच्छा व्यक्त करत संपवले जीवन
NEET
अनुराग अनिल बोरकरPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या छोट्याशा गावात आज मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गोरखपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झालेल्या अनुराग अनिल बोरकर (वय १९) याने आदल्या दिवशीच गळफासाने जीवन संपवले. त्या घटनमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेने समाजमनाला धक्का बसला आहे.

NEET
Chandrapur Leopard Attack | चिंधीचक गावाच्या मध्यवस्तीत बिबट्याची एन्ट्री; तिन शेळ्यांचा फडशा

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव निवासी व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग अनिल बोरकर याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा (NEET) उत्तीर्ण होऊन दुसऱ्या फेरीत गोरखपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. वैद्यकीय शिक्षणासाठी तो आज मंगळवारी गोरखपूरला रवाना होणार होता. परंतू त्याच्या आयुष्यातील ही सर्वांत महत्त्वाची वाटचाल सुरू होण्यापूर्वीच आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास अनुरागने स्वतःच्या खोलीत सिलींग फॅनला गळफास लावून घेतला.

सुसाईड नोटमध्ये व्यक्त केलेली वेदना
अनुरागने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “मला डॉक्टर बनायचं नाही. मला साडेपाच वर्षे वाया घालवायची नाहीत. त्या काळात होणाऱ्या अभ्यासाच्या प्रचंड दबावाखाली जगायचं नाही. मला व्यवसायात रस आहे आणि तेवढे पैसे मी व्यवसायातूनही कमावू शकतो,” अशा आशयाच्या भावना त्याने लिहिल्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी सांगितले.
NEET
Chandrapur crime : कुख्यात गुंड चिन्ना आंधेवारला पोलिसांचा दणका; वर्षभरासाठी कारागृहात रवानगी

पहाटे त्याची आई त्याला उठवण्यासाठी खोलीत गेली असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत बघून धक्काच बसला. तत्काळ तिने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. ही माहिती गावात पसरली. अनुराग हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या मृत्यूमुळे आई-वडील व बहिणी, आजीआजोबा असा आप्त परिवार असून त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण गाव दुःखात बुडाले असून अंत्यसंस्कार नवरगाव स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news