Chandrapur News : शासकीय आश्रमशाळा चिंधीचक राज्यस्तरीय गुणांकनात महाराष्ट्रात प्रथम

Chindhichak Ashram School Chandrapur : विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

Chindhichak Ashram School Chandrapur
आश्रमशाळा चिंधीचकच्‍या मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे अभिनंदन करताना नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह.Pudhari
Published on
Updated on

Chindhichak Ashram School Chandrapur

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्र २०२५-२६ च्या गुणांकन स्पर्धेत नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचक (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) या शाळेने ८१.२४ टक्के गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्यस्तरीय गुणांकन स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास मंत्रालयामार्फत अमरावती, ठाणे, नाशिक आणि नागपूर असे चार आदिवासी विकास विभाग कार्यरत आहेत. या चारही विभागांमध्ये एकूण ५०४ शासकीय आश्रमशाळा असून आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त श्रीमती लीना बन्सोड यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये राज्यस्तरीय गुणांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेतील सुविधा आणि विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी ही स्पर्धा राबविण्यात आली.


Chindhichak Ashram School Chandrapur
Chandrapur News | चिंधीचक आश्रमशाळेतील शाळा प्रवेशोत्सवासाठी बैलबंडी मिरवणूक आणि विद्यार्थिनींच्या बँड पथकाचे आकर्षण

शाळांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारीत

या स्पर्धेत शाळांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. यामध्ये बालहक्क संरक्षण प्रणाली, ई-निरीक्षण ॲपवरून प्राप्त निरीक्षणे, पायाभूत साक्षरता (भाषा) चाचणी, पायाभूत संख्याज्ञान (गणित) चाचणी तसेच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाशी संबंधित विविध घटकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व बाबींचे मूल्यांकन तीन त्रयस्थ संस्थांमार्फत करण्यात आले. 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी', 'बाल संरक्षण प्रणाली', 'माझी शाळा माझा स्वाभिमान' हे उपक्रम प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, दिल्ली यांच्या माध्यमातून राबविण्यात आले, तर 'वोपा' संस्थेमार्फत पायाभूत साक्षरता अभियानांतर्गत भाषा आणि गणित विषयांवरील उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.


Chindhichak Ashram School Chandrapur
Raigad Government Medical College Result: रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा डंका; पहिल्या बॅचचे घवघवीत यश

Chindhichak Ashram School Chandrapur
Pudhari

आश्रमशाळा चिंधीचकने यशस्वीरित्या राबवले सर्व उपक्रम

या राज्यस्तरीय गुणांकनात नागपूर विभागातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचकने हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या राबवून ८१.२४ टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. तर अमरावती विभागातील शासकीय आश्रमशाळा झटाळा हिने ७२.१२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला असून नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळा देवमोगरा ही ६६.९४ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिली.


Chindhichak Ashram School Chandrapur
Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती

सामूहिक परिश्रम आणि समन्वय ठरला महत्त्वाचा

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंधीचकच्या या यशामागे विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सामूहिक परिश्रम आणि समन्वय महत्त्वाचा ठरला आहे. तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती जागृती कुमरे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वाटाने यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.दरम्यान, नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी मुख्याध्यापकांचा गौरव करून अभिनंदन केले. शासकीय आश्रमशाळा चिंधीचकच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news