Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती

महिलांच्या शिक्षणामागील आधारव्यवस्था आणि मुक्त शिक्षण व्यवस्थेच्या ताकदीचे हे बोलके उदाहरण ठरले
Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती
Published on
Updated on

प्रशांत भागवत

उमरखेड :“शिक्षणासाठी वय, परिस्थिती किंवा जबाबदाऱ्या आड येत नाहीत,” याची प्रचिती सोमवारी दि १ जून रोजी येथील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाली. परीक्षा हॉलमध्ये एक माता उत्तरपत्रिका लिहित असताना, बाहेर झाडाखाली फांदीला बांधलेल्या पाळण्यात तिचे बाळ झोपलेले होते. तर बाळाला तिची आजी प्रेमाने झोका देत होती. महिलांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची, कुटुंबाच्या आधाराची आणि मुक्त शिक्षण व्यवस्थेच्या व्यापक सामाजिक भूमिकेची ही जिवंत कहाणी ठरली.

घर, संसार, मुलांची जबाबदारी आणि त्यासोबत स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द — ग्रामीण व सर्वसामान्य महिलांसाठी हे अनेकदा मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत महिलांना, कामगारांना, गृहिणींना, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षणापासून दूर गेलेल्या व्यक्तींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती
Teacher Inspection: पोरं सोडा, गुरुजींनाच येईना उत्तर! सातवीच्या वर्गाची गुणवत्ता पाहून सीईओंचा चढला पारा

या बाबत माहिती घेतली असता बाळाची आजी या दोघीही तालुक्यातील जेवली येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. उमरखेडपासून तब्बल ३६ किलोमीटर अंतर पार करून त्या परीक्षा केंद्रावर पोहोचल्या होत्या. मुलगी निर्धास्तपणे परीक्षा देऊ शकेल म्हणून त्या स्वतः बाहेर थांबून नातीला झोका देत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण केवळ विद्यार्थिनीच्या जिद्दीवर नाही, तर कुटुंबाच्या पाठबळावरही उभे असते, याची जाणीव हा प्रसंग करून देणारा ठरला.

मुक्त विद्यापीठाच्या “ज्ञानगंगा घरोघरी” या ब्रीदवाक्याला साजेसे काम जर प्रत्यक्षात कोणती संस्था करत असेल, तर त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती
Maharashtra HSC Result NEET Exam Stress: बारावी निकालानंतर लगेच नीट; विद्यार्थ्यांवर मानसिक ताण

“ज्ञानगंगा घरोघरी” ब्रीदवाक्याची प्रत्यक्ष अनुभूती

गृहिणी, कामगार, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, शिक्षण अर्धवट सोडलेले युवक-युवती आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे काम करत असल्याचे या प्रसंगातून स्पष्ट होते.

आई परीक्षा हॉलमध्ये… बाहेर आजीकडून बाळाला झोका

आई शिक्षणासाठी परीक्षा देत असताना झाडाखाली पाळण्यात झोपलेल्या बाळाला तिची आईच सांभाळत होती. एका बाजूला शिक्षणासाठी झटणारी माता, तर दुसऱ्या बाजूला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कुटुंब — महिलांच्या शिक्षणामागील आधारव्यवस्था आणि मुक्त शिक्षण व्यवस्थेच्या ताकदीचे हे बोलके उदाहरण ठरले.

Nanded inspiring news | आई परीक्षा हॉलमध्ये… झाडाखाली पाळण्यात बाळ; ‘ज्ञानगंगा घरोघरी’ची प्रचिती
Parbhani News : बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच ठरल्या सरस

“दरवर्षी मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विवाहित, विधवा, परित्यक्ता महिला, दिव्यांग विद्यार्थी तसेच आशा व अंगणवाडी सेविका प्रवेश घेतात. कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत हे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करून चांगल्या पद्धतीने परीक्षा देतात. समाजातील विविध घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य मुक्त विद्यापीठ करीत आहे.”

— प्रा. बालाजी लाभशेटवार केंद्रसंयोजक, गो. सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news