Chandrapur News | चिंधीचक आश्रमशाळेतील शाळा प्रवेशोत्सवासाठी बैलबंडी मिरवणूक आणि विद्यार्थिनींच्या बँड पथकाचे आकर्षण

पालक मेळाव्यासह नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणवंतांचा सत्कार व विविध शैक्षणिक योजनांची माहिती
Chandrapur Chindhichak Ashram School
Chandrapur Chindhichak Ashram School pudhari
Published on
Updated on

Chandrapur Chindhichak Ashram School

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेत उद्या मंगळवारी (दि. ३०) शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पारंपरिक, सांस्कृतिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम अनुभवायला मिळणार असून बैलबंडी मिरवणूक व विद्यार्थिनींच्या बँड पथकाचे सादरीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित या सोहळ्याची सुरुवात गावातून प्रभात फेरीने होणार आहे. बैलबंडीवर विद्यार्थ्यांसह ढोल-ताशे आणि विद्यार्थिनींच्या बँड पथकाच्या सहभागातून गावात शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

Chandrapur Chindhichak Ashram School
Chandrapur News : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

या प्रवेशोत्सवात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार असून मार्च २०२६ मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘राघोजी भांगरे' गुणगौरव पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

Chandrapur Chindhichak Ashram School
Chandrapur Fraud News | फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष; १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

यावेळी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विमान प्रवास अभ्यास सहल, उन्हाळी प्रशिक्षण शिबीर, JEE-NEET प्रवेशपूर्व प्रशिक्षण, भारत दर्शन, इंग्लिश स्पीकिंग यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, शूज आणि शालेय गणवेशाचे वितरणही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार  किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते होईल तर  प्रकल्प अधिकारी जागृती कुंभरे अध्यक्षस्थानी राहतील. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिंधीचकचे मुख्याध्यापक  मंगेश ब्राम्हणकर यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news