Chandrapur Crime | चारित्र्यावरील संशयातून पत्नीचा निर्घृण खून: आरोपी पतीला जन्मठेप

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा कुडेसावली येथील खळबळजनक घटना
  Life Imprisonment
Life Imprisonmentfile photo
Published on
Updated on

Gondpipri Husband Life Imprisonment

चंद्रपूर कोठारी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मौजा कुडेसावली (ता. गोंडपिपरी) येथे घडलेल्या या खळबळजनक प्रकरणात मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम (DJ-1) यांनी आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६०) याला दोषी ठरवत जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास मौजा कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल रामटेके याला पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६०) हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

  Life Imprisonment
Chandrapur Bus Fire | गडचिरोली - चंद्रपूर मार्गावर थरार : धावत्या ई-बसला भीषण आग; ४३ प्रवाशांची सुखरूप सुटका

या प्रकरणी मृतक महिलेचा मुलगा अमर धनपाल रामटेके (वय ३०) याने कोठारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास कोठारी पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश खरसान यांनी अत्यंत बारकाईने व सखोल पद्धतीने केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच केमिकल अ‍ॅनालायझर (C.A.) रिपोर्ट यासारखे महत्त्वाचे पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

  Life Imprisonment
Unseasonal Rain Chandrapur | अवकाळी पाऊस, गारपिटीने उन्हाळी धान जमीनदोस्त: शेतकऱ्यांची तातडीच्या मदतीची मागणी

खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता आसिफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. सादर करण्यात आलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी धनपाल रामटेके याला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत ३ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून मपोशि मनीषा गोवर्धन चिवंडे (ब.नं. २८३३) यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news