Nagpur Graduates Constituency Election | पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदानादिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 'हे' आठवडी बाजार बंद

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आदेश
Marathwada Graduates Constituency Election 2026
Marathwada Graduates Constituency Election 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

Chandrapur Weekly Market Closed

चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 साठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीत पार पडावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने मतदान होत असलेल्या ठिकाणी शुक्रवारी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याच दिवसापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 58 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

Marathwada Graduates Constituency Election 2026
Gadchiroli News | मंगळसूत्र गहाण ठेवून जखमी शेतकऱ्याने जिल्हा शल्य चिकित्सकास दिले हजारो रुपये

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 126 व 130 नुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वीच्या 48 तासांच्या कालावधीत प्रचारबंदी लागू राहणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षचिन्हे, घोषणा, प्रचारपत्रके, बॅनर किंवा मतदानाचे आवाहन करणारे साहित्य बाळगण्यास अथवा प्रदर्शित करण्यास प्रतिबंध आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनिक्षेपक किंवा इतर ध्वनियंत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यासही मनाई आहे.

या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि मतदारांना मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता यावा, यासाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Marathwada Graduates Constituency Election 2026
Gadchiroli News | नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार आठवडी बाजार बंद ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून मतदान होत असलेल्या संबंधित नगरांच्या ठिकाणी शुक्रवारी भरणारे आठवडी बाजार दि. 23 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

येथील आठवडी बाजार राहणार बंद :

वरोरा, शेगाव बु. (ता. वरोरा), चिमूर, भिसी, शंकरपूर (ता. चिमूर) नागभीड (ता. नागभीड), ब्रह्मपुरी, गांगलवाडी (ता. ब्रह्मपुरी), सिंदेवाही, नवरगाव (ता. सिंदेवाही), भद्रावती (ता.भद्रावती), चंद्रपूर, घुग्गुस (ता. चंद्रपूर), मुल, सावली, बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर (ता. कोरपना), पोंभुर्णा आणि गोंडपिपरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news