चंद्रपुरात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राचा खून

अष्टभुजा वार्डातील घटना; एकास अटक
Chandrapur murder News
चंद्रपुरात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राचा खून करण्यात आला.File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : उसनवारीचे पाचशे रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या दोघा मित्रांच्या भांडणात लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मित्र गंभीर जखमी आहे. ही घटना शहरातील अष्टभुजा वार्डात मंगळवारी (दि.३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आशिष परसराम असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून साईनाथ रंगारी असे जखमी मित्राचे नाव आहे. त्यांच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी साईनाथचा भाऊ भावनाथ रंगारी याला ताब्यात घेतले आहे.

Chandrapur murder News
घरगुती वाद टोकाला; जन्मदात्या बापाने केला मुलाचा धारदार शस्राने खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष व साईनाथ हे दोघे मित्र चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डात राहतात. काही कामासाठी आशिषने साईनाथला पाचशे रुपये उसने दिले होते. त्यापैकी शंभर रुपये त्याने परत केले होते. उर्वरित चारशे रुपये त्याच्याकडे बाकी होते. मंगळवारी (दि.३) आशिष पैशासाठी साईनाथच्या घरी गेला होता. घरी जावून त्याने उसने दिलेले पैसे मागितले. पैसे देण्यास साईनाथ कानाडोळा करीत असल्याने त्याने पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी साईनाथचा भाऊ त्याच्या मदतीला धावून आल्याने दोघांनीही आशिषला मारहाण केली. व साईनाथने आशिषच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. आशिषनेसुध्दा साईनाथला मारहाण केली. आशिष व साईनाथ दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान आशिषचा मृत्यू झाला. तर साईनाथ गंभीर जखमी झाल्याने त्याला सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी साईनाथच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

Chandrapur murder News
जळगाव : ३० लाखासाठी महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news