घरगुती वाद टोकाला; जन्मदात्या बापाने केला मुलाचा धारदार शस्राने खून

अमरावतीमधील लुंबिनी नगरातील घटना
Amravati murder news
बापाने मुलाचा धारदार शस्राने खून केला
Published on
Updated on

अमरावती : घरगुती वाद टोकाला गेल्याने बापाने आपल्या पोटच्या मुलाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारी तीनच्या सुमारास अमरावतीमधील लुंबिनी नगरात घडली. राहुल पांडुरंग काकडे (वय ४०) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी वडील रामकृष्ण काकडे (वय ६१) यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Amravati murder news
पुणे : गृह कर्जाची एजन्सी चालवणार्‍या व्यक्तीचा पुण्यात कोयत्याने खून

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, वडील सेक्युरिटी गार्डची नोकरी करतात. मात्र मुलगा काही काम न करता घरीच असायचा. मंगळवारी वडील पांडूरंग कामावरून घरी आले असता राहुल व त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात बापाने धारदार शस्त्राने राहुलचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर जखमी मुलगा राहुल याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत्यू घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांसह सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. व संशयित आरोपी वडील पांडुरंग काकडे याला अटक केली. मुलाच्या खूनप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.

Amravati murder news
हिंगोली : डोळ्यात मिरचीपूड टाकून तलाठ्याचा निर्घृण खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news