Chandrapur Tiger Attack | जंगलालगत गुरे चारताना वाघाचा हल्ला; वृद्ध गुराख्याचा मृत्यू

सावली वनपरिक्षेत्रातील निलासनी पेठगाव येथील घटना; वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल, गस्त वाढविली
Elderly cattle grazer killed
Chandrapur Tiger AttackPudhari
Published on
Updated on

Chandrapur Human Animal Conflict

चंद्रपूर : जंगलालगत शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय गुराख्यावर वाघाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील निलासनी पेठगाव परिसरात घडली. वासुदेव लक्ष्मण वाकुडकर (वय ६५) रा. निलासनी पेठगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर असे मृत गुराख्याचे नाव आहे.

निलासनी पेठगाव येथील श्रीमती वंदना खोब्रागडे यांच्या सर्व्हे क्रमांक ६० मधील शेतात वाकुडकर हे गुरे चरत होते. हे शेत संरक्षित सर्व्हे क्रमांक १५१२ च्या सीमेपासून अवघ्या १५ मीटर अंतरावर आहे. गुरे चारत असताना वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाकुडकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Elderly cattle grazer killed
Chandrapur Farmer Protest | धान बोनससह शेतकरी प्रश्नांसाठी गुरूवारी नागभीड तहसीलवर आक्रोश मोर्चा

घटनेची माहिती मिळताच सावली वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व गस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा परिसर चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येतो. घटनास्थळ उपरी बीट, व्याहाड राऊंडमध्ये आहे.

दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील गस्त वाढविली आहे. जंगलालगतच्या शेतशिवारात जाताना शेतकरी, गुराखी व ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, एकट्याने जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे आणि शक्यतो समूहाने जावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news