काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या आधारावर काही जागा जिंकल्या

सुधीर मुनगंटीवार यांचा हल्‍लाबाेल
Sudhir Mungantiwar
लाेकसभा निवडणूक निकालावर बाेलताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्‍लाबाेल केला. File Photo

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा :
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्‍लिम आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या. पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Sudhir Mungantiwar
महायुतीत विधानसभेसाठी रस्सीखेच; भाजप धरणार १७० जागांचा आग्रह

तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली

  मुनगंटीवार म्‍हणाले,  देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते. तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले अशा भावना यांनी व्यक्त केल्या. 

Sudhir Mungantiwar
विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजप, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

काँग्रेसने प्रचारात महिलांची फसवणुक केली

सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांंत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले. आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म (गॅरंटी गार्ड) घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला', असेही ते म्‍हणाले.

भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar
नॅरोटिव्ह सेटिंगमुळे भाजप पराभूत : राधाकृष्ण विखे

‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार

ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. 

Sudhir Mungantiwar
चुकांची जबाबदारी सामूहिक; समन्वयाच्या अभावावरून भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणी

टायगर अभी जिंदा है...

निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी इंदिरा गांधींच्‍या ‘त्‍या’ विक्रमाशी बरोबरी करणार का?

मी थकणारा आणि थांबणारा नाही

लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news