नॅरोटिव्ह सेटिंगमुळे भाजप पराभूत : राधाकृष्ण विखे

नॅरोटिव्ह सेटिंगमुळे भाजप पराभूत : राधाकृष्ण विखे
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilRadhakrishna Vikhe Patil

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत नॅरोटिव्ह सेटिंगमुळे भाजपचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नांदेड लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil
राज्यात चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी: राधाकृष्ण विखे- पाटील

बहुतांश मतदारांचा कौल भाजपविरोधी

नॅरोटिव्हमुळे वाढलेले मतदान हे भाजपचे नव्हते, असे लक्षात आले. मतदानासाठी परदेश, परराज्यातून आलेल्या बहुतांश मतदारांचा कौल भाजपविरोधी ठरला. शेतकर्यांमध्येही असलेल्या नाराजीचाही फटका बसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil
आ. आव्हाडांची हकालपट्टी करावी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण आणि संविधान बदलाच्या चुकीमुळे भाजपला फटका

विखे पाटील म्हणाले की, सहाही विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वांनी नियोजनपद्धतीने काम केलेले आहे. परंतु मराठा आरक्षण आणि संविधान बदलाच्या चुकीच्या प्रचारामुळे भाजपला फटका बसला आहे. पक्षामध्ये कुठलीही गटबाजी दिसून आली नाही. इंडिया आघाडीने नकारात्मक प्रचार करून मतदान आपल्या पदरात पाडून घेतले आहे. परिणामी मतदान हे महायुतीविरोधात झाले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्या : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भाजप पक्ष ओव्हर कॉन्फिडन्स

लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता. ही चुकी आता विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यासाठीच आता चिंतन बैठकांवर जोर दिला जात आहे. नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही परभवाचा विचार न करता पक्ष बांधणीसाठी ते प्रयत्न करत असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, महानगराध्यक्ष दिलीप कंतकुर्ती, प्रदेश सदस्य चैतन्यबापू देशमुख आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news