CM Fadnavis vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी रामाचा मार्ग स्वीकारावा; रोज रामरक्षा म्हणावी : मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला!

अयोध्येतील रामाच्या चढाव्याच्या कथित चोरीप्रकरणावर आंदोलनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis
Published on
Updated on

चंद्रपूर : अयोध्येतील रामाच्या चढाव्याच्या कथित चोरीप्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना रामाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे धार्मिक कार्यक्रमासाठी शोभाताई फडणवीस यांच्या निवासस्थानी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना राम आठवले, याचा मला आनंद आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजेत. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता, त्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. त्यांनी रामाच्या मार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. केवळ आजच्या दिवसापुरते नाही, तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी, अशी माझी अपेक्षा आहे.”

CM Devendra Fadnavis
Raj Thackeray: राम मंदिरातील गैरव्यवहारावर पंतप्रधानांचं मौन का? भक्तांच्या पैशांचा हिशेब कोण देणार? राज ठाकरेंचा सवाल

दरम्यान, अयोध्येतील रामाच्या चढाव्याच्या कथित चोरीप्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता धार्मिक आणि भावनिक विषयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात या प्रकरणावरून आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news