वाढोणा येथे ५ हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकासह एकाला अटक

Chandrapur Bribery Case |अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी मुख्याध्यापकाकडे लाचेची मागणी
Gadchiroli Bribery Case
वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाच्या कनिष्ठ लिपिकासह एका व्यक्तीला लाच घेतना अटक केली. Pudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेल्या अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करणे व जि.प. शिक्षण विभागास पाठविण्याकरीता मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग पत्राकरीता ५ हजारांची लाच घेताना नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाच्या कनिष्ठ लिपिकासह एका खासगी व्यक्तीला आज (दि. ८) रंगेहाथ अटक करण्यात आली. मोहम्मद अकिल इसाईल शेख (वय ५४), श्रीकृष्ण परसराम शेंडे (वय ३४) अशी आरोपींचे नावे आहेत. दोन्ही आरोपी वाढोणा येथील रहिवासी आहेत. (Chandrapur Bribery Case)

Gadchiroli Bribery Case
चंद्रपूर : बैलांना वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगा नाल्यातून वाहून गेला; वडील वाचले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नागभीड येथील रहिवासी असून ते समाजसेवा विद्यालय वाढोणा (ता. नागभीड) येथून मुख्याध्यापक पदावरून सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले. तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेले अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करणे व मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जि.प. चंद्रपूर यांच्याकडे पाठविण्याकरीता समाजसेवा विद्यालय वाढोणा येथील आरोपी कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख यांचेशी संपर्क केला होता. (Chandrapur Bribery Case)

Gadchiroli Bribery Case
चंद्रपूर : पडक्या घरातील 'त्या' बिबट्या मादीसह तीन बछड्यांना केले निसर्गमुक्त

परंतु, आरोपींनी तक्रारदारास या कामाकरीता १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने चंद्रपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली. सदर विभागाने तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा केली. कनिष्ठ लिपिकास 15 हजार देण्याचे ठरल्यानंतर प्रथम 5 हजार रूपये त्यांनतर उर्वरित10 हजार देण्याचे ठरले. त्यापैकी आज वाढोणा येथील अपना टी स्टॉल मध्ये कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकिल इस्राईल शेख याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तर लाच स्वीकारून त्यांनी गावातीलच श्रीकृष्ण परसराम शेडे यांच्याकडे दिल्याने लाचलुचपत विभागाने त्यालाही अटक केली.

Gadchiroli Bribery Case
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी

पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले, पोहवा नरेश नन्नावरे, पोशि. राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, महिला पो.शि. मेषा मोहुर्ले, पोहवा रवि तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news