चंद्रपूर : पडक्या घरातील 'त्या' बिबट्या मादीसह तीन बछड्यांना केले निसर्गमुक्त

आठवडाभरापूर्वी घरात झाला होता बछड्यांचा जन्म
Wild leopard release
बिबट्या मादीसह तीन बछड्यांना केले निसर्गमुक्त करण्यात आले
Published on
Updated on

चंद्रपूर : आठवडाभरापूर्वी नागभिड तालुक्यात बाळापूर खुर्द गावात  एका पडक्या घरात जन्मास आलेल्या तीन बछड्यांसह बिबट्या मादीला मंगळवारी (दि.६) रेस्कू करून मध्यरात्री निसर्गमुक्त करण्यात आले.

Wild leopard release
चंद्रपूर : बल्लारपूरात देशी कट्ट्यासह 7 जीवंत काडतुससोबत आरोपी अटकेत

नागभिड तालुक्यातील बाळापूर खुर्द गावात जंगलाला लागून असलेल्या सेलोटे यांच्या  एका पडक्या घरात आठवडाभरापूर्वी बिबट्या मादीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास बिबट्या मादी घरातून बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. वनरक्षक मैंद यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी काही नागरिकांना सोबत घेऊन त्या पडक्या घराची पाहणी केली. तेथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. 

Wild leopard release
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात संततधार; कार वाहून गेली, दोघे बचावले

काल सोमवारी बिबट मादी व बच्छड्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने त्या पडक्या घराच्या परिसरात पाळत ठेवली. जंगलाच्या दिशेने एका बाजूस मोकळीक ठेवून तिन्ही बाजूंना जाळी लावन्यात आली. बिबट मादी व बच्छड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्या घरात व परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मंगळवारी सायंकाळी त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. त्या पिंजऱ्यात बिबट मादीला पकडण्यासाठी रेस्कूची तयारी करण्यात आली परंतु त्या रात्री बिबट मादी पिंजऱ्यात शिरली नाही.

Wild leopard release
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील तेरा गावांचा संपर्क तुटला

ताडोबाचे पशु वैद्यकिय अधिकारी खोब्रागडे यांनी मंगळवारी बच्छड्यांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर बिबट मादी व बच्छड्यांच्या सुरक्षेसाठी तळोधी बा, नागभिड, ब्रम्हपुरी येथील वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्याच रात्री पुन्हा बच्छड्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनंतर रात्रीच बिबट मादी व बच्छड्यांना निसर्गमुक्त करण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरी, नागभीड व तळोधी (बा.) येथील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news