Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले

पाण्याची पातळी वाढल्याने इरई  धरणाचे तीन दरवाजे उघडले : सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध; शेतकरी आनंदित
Chandrapur Rain
चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत. इरई प्रकल्प ९६.१८% भरलेला असून सकाळी ७:३० वाजता त्याचे तीन दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन मोठे व आठ मध्यम प्रकल्प आहेत . त्यापैकी आसोलामेंढा व इरई शंभर टक्के भरले आहे. तर मध्यम प्रकल्पापैकी घोडाझरी,  नलेश्वर, चंदई, अमलनाला, चारगाव लाभाणसराड, पगडीगुड्डम, डोंगरगाव आदी आठही तलाव ही शंभर टक्के भरले आहेत.\

Chandrapur Rain
Chandrapur Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; २४ तासांत ५० मिमी पावसाची नोंद

मागील चौवीस तासात इरई प्रकल्प परिसरात पाऊस पडल्याने 0.25 मीटरने तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असोलामेंढा व इरई धरणातील पाणीसाठा शेती व इतर गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. आणि सध्या पुरेसा साठा उपलब्ध आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

इरई नदीकाठच्या भागात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचा व सुरक्षिततेसाठी सूचना पाळण्याचा सल्ला दिला आहे.

Chandrapur Rain
Chandrapur Rain | वरोरा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर : शेकडो हेक्टरवरील कापूस भुईसपाट

मागील 24 तासात काही प्रकल्प परिसरात १५ मिमी ते ३० मिमी पर्यंत पाऊस झाला असून पुढील काही दिवसांतही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे आणि जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news