Chandrapur Railway Job Fraud | रेल्वे नोकरीच्या आमिषाने 2.17 कोटींची फसवणूक; चंद्रपूरसह पाच जिल्ह्यांतील 26 जणांना गंडा

बनावट नियुक्तीपत्र व पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देऊन तब्बल 2.17 कोटींची लूट; एक आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू
  Railway Scam
Railway Scam Pudhari Online
Published on
Updated on

Fake Railway Recruitment Chandrapur

चंद्रपूर: रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत चंद्रपूरसह विविध जिल्ह्यांतील तरुणांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींनी एकूण 26 जणांकडून तब्बल 2 कोटी 17 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आर्थिक गुन्हे शाखेने पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे नोकरीचे आमिष, लाखोंची उकळपट्टी

फिर्यादी कौस्तुभ विलास आदेश (वय 35) रा. दाताळा रोड, चंद्रपूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुजीबुर लतीफ कुरेशी, रविंद्र संबाजी वाघमारे आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग यांनी रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडत फिर्यादीसह इतर 14 जणांकडून एकूण 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपये घेतले.

  Railway Scam
Chandrapur crime news: बाप रे! संपत्तीसाठी सख्या बहिणीचा गळा चिरला, आईवरही वार; चंद्रपूर हादरलं!

कोलकत्त्यात ‘ट्रेनिंग’चा बनाव

आरोपींनी संबंधितांना कोलकत्ता येथे नेऊन हॉटेलमध्ये ठेवले. विविध तथाकथित ट्रेनिंग स्कूलमध्ये नेऊन त्यांना बनावट प्रशिक्षण दिल्याचा आभास निर्माण केला. त्यानंतर बनावट पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि नियुक्तीपत्र देऊन विश्वास बसवण्यात आला.

नोकरी न देता फसवणूक उघड

काही काळानंतर प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न मिळाल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुरेंद्र रामकृष्ण तेलंग (रा. गोधनी, नागपूर) याला 3 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथून अटक करण्यात आली असून त्याचा पोलिस कोठडी रिमांड (PCR) घेण्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत (MCR) आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

  Railway Scam
Chandrapur Crime News | चंद्रपुरात अवैध कोंबड्यांच्या झुंजी, पोलिसांची धाड; ३ जणांना अटक

पाच जिल्ह्यांतील 26 जणांची फसवणूक

तपासादरम्यान चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि जळगाव जिल्ह्यांतील एकूण 26 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी या सर्वांकडून मिळून तब्बल 2 कोटी 17 लाख 35 हजार रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

ज्या व्यक्तींना या आरोपींनी रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले असतील आणि बनावट कागदपत्रे दिली असतील, अशा सर्वांनी आपली मूळ कागदपत्रे घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे हजर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  Railway Scam
Chandrapur Crime | चंद्रपूर हादरले! अघोरी पूजेचे रॅकेट उघड, कासव-घुबडांचा वापर, विधवा व कुमारिकांचे शोषण

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे यांच्यासह विशेष पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news