चंद्रपूर : बल्लारपूरात देशी कट्ट्यासह 7 जीवंत काडतुससोबत आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Crime news chandrapur
बल्लारपूरात देशी कट्ट्यासह 7 जीवंत काडतुससोबत आरोपी अटकेत Pudhari Photo
Published on
Updated on

बल्लारपूर शहरात अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलीस विभागाने मोहीम उघडली आहे. गुरुवारी (दि.1) एका संशयित आरोपीला देशीकट्टा आणि सात जिवंत काढतुसासह अटक करण्यात आली. रोहित शिवप्रसाद निषाद (वय 24 रां. भगतसिंग वार्ड बल्लारपूर) असे आरोपीचे नाव आहे.

Crime news chandrapur
Jalgaon Crime News | गावठी कट्टासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरूणाला अटक

चंद्रपुर जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगुन अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा इसमांची माहिती काढून त्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिता जनबंधु, यांनी दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध हत्यार बाळगणाऱ्याची माहिती काढून लक्ष ठेवून होते. अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगनाऱ्या विरोधात मोहिमेदरम्यान पथकाला बल्लारपुर येथे भगतसिंग वार्डामधील डब्लूसी एल मैदानावर इसम कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Crime news chandrapur
गावठी पिस्तूल, काडतूस बाळगणार्‍यास पौडला अटक

यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुरले त्यांच्या पथकाने तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, सदर इसपाच्या कमरेला असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या खिशात देशी कट्टात वापरण्यात येणारे सात जिवंत काडतुस व एक खाली केस आढळून आला. आरोपी विरोधात बल्लारपूर गुन्हा नोंद दाखल करून अटक करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news