Chandrapur Crime | डायग्नोस्टिक सेंटरमधील एक्स-रे रूममध्ये सीसीटीव्हीचा संशय: महिलेच्या तक्रारीनंतर डॉक्टराविरुद्ध गुन्हा

चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमधील प्रकारामुळे खळबळ
 X-ray Room CCTV Privacy Breach
X-ray Room CCTV Privacy BreachPudhari
Published on
Updated on

X-ray Room CCTV Privacy Breach

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे काढताना महिला रुग्णाला कपडे काढण्यास सांगण्यात आले आणि त्याच खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचा संशय निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने दुर्गापूर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वस्थ असल्याने एक महिला एक्स-रे काढण्यासाठी तुकूम येथील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होती. एक्स-रे रूममध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिला वरचे कपडे काढण्यास सांगितले. त्यावर संबंधित महिलेने कपडे का काढायचे, असा प्रश्न उपस्थित केला.

आतील कपड्यांमध्ये मेटल असू शकते व त्यामुळे एक्स-रे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असे कारण दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर महिलेचा एक्स-रे काढण्यात आला.

 X-ray Room CCTV Privacy Breach
Chandrapur Politics | चंद्रपुरात काँग्रेसला धक्का : वारजूकर बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश  

सीसीटीव्हीबाबत संशय

दरम्यान, एक्स-रे रूमच्या वरच्या कोपऱ्यात लाल रंगाचा छोटा दिवा दिसल्याने संबंधित महिलेच्या मनात संशय निर्माण झाला. याबाबत विचारणा केल्यावर चोरी टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संशय वाढल्याने संबंधित महिला डॉक्टरांच्या कक्षात गेली असता मॉनिटरवर लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज सुरू असल्याचे तिला दिसल्याचा आरोप आहे. मागील काही मिनिटांचे फुटेज दाखवण्याची मागणी केली असता तांत्रिक कारणामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित  डॉ. सचिन विश्वंभर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलिस ठाणे करीत असून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news