Chandrapur Congress | काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा

राजेश अडूर यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती
Dhanorkar Group vs Wadettiwar Group
Dhanorkar Group vs Wadettiwar GroupPudhari
Published on
Updated on

Dhanorkar Group vs Wadettiwar Group

चंद्रपूर : विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील नगरसेवक राजेश अडूर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांच्या घरांवर थेट बैठकीच्या नोटिसा चिपकवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रविवार (दि.१) दुपारी बारा वाजता राजेश अडूर यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीसाठी धानोरकर गटातील काही नगरसेवकांना प्रत्यक्ष नोटीस न देता त्यांच्या घरांवर नोटीस चिपकवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामागे नेमका कोणता अधिकार वापरण्यात आला, असा प्रश्न धानोरकर गटाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Dhanorkar Group vs Wadettiwar Group
Chandrapur Congress | चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटणार

सदर नोटीस ज्या नगरसेवकांच्या घरांवर लावण्यात आली, त्यामध्ये सुरेंद्र अडबाले, सुनंदा धोबे, रामनरेश यादव, राहुल घोटेकर आणि शेख यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र अडबाले यांच्या घरात ते वास्तव्यास नसून त्यांचा भाऊ राहत असल्याची माहिती आहे. अशा पद्धतीने पक्षाच्या बैठकीच्या नोटिसा पाठवता येत नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

नोटिसीत गट किंवा आघाडी नोंदणीबाबत निर्णय, गटनेत्याची निवड, गटाचे नियम व घटना मंजूर करणे तसेच नोंदणीसाठी अधिकार प्रदान करणे, असे मुद्दे नमूद होते. मात्र गटनेता अद्याप निश्चित नसताना अशा स्वरूपाची नोटीस काढण्यात आल्याने आक्षेप घेतले जात आहेत.

Dhanorkar Group vs Wadettiwar Group
Chandrapur Congress | चंद्रपूरचे सत्ताकारण...! खा.धानोरकर गटातर्फे सुरेंद्र अडबाले गटनेता

दरम्यान, धानोरकर गटाचे नगरसेवक या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, राजेश अडूर यांनी सर्व नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा करत, नोटीस स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांच्या घरांवर ती लावण्यात आल्याचे सांगितले. काँग्रेसमधील या अंतर्गत वादामुळे आगामी गटनोंदणी प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news