Chandrapur Congress | चंद्रपूरचे सत्ताकारण...! खा.धानोरकर गटातर्फे सुरेंद्र अडबाले गटनेता

चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ जागा असून, त्यापैकी २७ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत
Maharashtra Farmers Aid Issue
Pratibha DhanorkarPudhari
Published on
Updated on

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या सत्तासंघर्षात गटनेता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनतर खासदार प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक सुरेंद्र आडबाले यांची निवड झाली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सुरेंद्र आडबाले यांची गटनेता म्हणून नियुक्ती केल्याचे रात्री उशिरा जाहीर केले.

चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ जागा असून, त्यापैकी २७ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत. गटनेता पद आपल्या गटाकडे यावे यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर १३ नगरसेवकांसह नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. दुसरीकडे ही माहिती मिळताच विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या १४ नगरसेवकांना विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवले.

प्रतिभा धानोरकर यांनी सुचवलेले नाव स्वीकारू नये आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुचवलेले नाव स्वीकारावे, अशी मागणी वडेट्टीवार गटाने विभागीय आयुक्तांकडे केली. मात्र, प्रतिभा धानोरकर यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत सर्व २७ नगरसेवकांचा पाठिंबा रवींद्र आडबाले यांना असल्याचे कागदपत्र सादर केले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच गटनेता पदासाठी हे नाव सुचवले असल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी विजय वडेट्टीवार यांचा समर्थक नगरसेवक महापौर होईल आणि प्रतिभा धानोरकर यांचा समर्थक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष पदावर राहील, असे ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. गटनेता पदाचा निर्णय दोन्ही गटांनी मिळून घ्यायचा असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. आता निर्णायक वळणावर या संपूर्ण प्रकरणात प्रदेश नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

27 सदस्यांचा गट, महापौर काँग्रेसचाच खा. प्रतिभा धानोरकर

दरम्यान, प्रांताध्यक्षांनी सांगितल्यानुसार गट नेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन हे वडेट्टीवार यांचे होतील. शेवटी कोणी कोणाचाही असला तरी हे सर्व पक्षाचे सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत.आम्ही रीतसर सर्व प्रोसेस पूर्ण करून गट तयार केला आहे. काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट तयार झाला आहे. प्रांताध्यक्षांनी दोघांचाही सुसंवाद रहावा यासाठी आमदार अडबाले सर यांची नियुक्ती केली होती याकडे खा प्रतिभा धानोरकर यांनी लक्ष वेधले. आरोप करत आहेत ते जबाबदार नेते नाही, स्वतः विजय भाऊ बोलले असते तर मी मान्य केला असते, पण बोलणारी व्यक्ती ही जबाबदार नसल्याने कोण काय आरोप करतात हे मी गृहीत धरत नाही. आम्ही नियमानुसार 27 लोकांची प्रोसेस केली आहे. आम्ही रीतसर गट स्थापन केला आहे.समोरचा गट कोर्टात जात असेल तर त्याला उत्तर देऊ. मी आता कुठलाही पत्र दाखवणार नाही. नोटिफिकेशन दिले जाईल तेव्हा महापौर बनेल आणि काँग्रेसचाच महापौर बनेल असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news