Chandrapur News | राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी चंद्रपूरचे ५० नागरिक गुजरातला रवाना

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथील राष्ट्रीय एकता परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून सहभाग; केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष निमंत्रण
National Unity Day Kevadia Gujarat
चंद्रपूर जिल्ह्यातील ५० नागरिकांचे विशेष प्रतिनिधी मंडळ गुजरातकडे रवाना झाले Pudhari
Published on: 
Updated on: 

National Unity Day Kevadia Gujarat

चंद्रपूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील एकता नगर (केवडिया) येथे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेड सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ५० नागरिकांचे विशेष प्रतिनिधी मंडळ गुजरातकडे रवाना झाले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी नक्षलग्रस्त राहिलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील नागरिकांना केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने या राष्ट्रीय सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.

देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात करण्यात आले आहे. या सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, विद्यार्थी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि संवेदनशील भागातील नागरिकांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश करण्यात आला आहे.

National Unity Day Kevadia Gujarat
Chandrapur News : महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप!

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या समन्वयातून जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आणि त्यांच्या पथकाने या दौऱ्याचे नियोजन केले. प्रतिनिधी मंडळाच्या पहिल्या टप्प्यात २६ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगळे यांच्यासोबत तीन नागरिक गुजरातला रवाना झाले. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्यासोबत ३३ नागरिक, तर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मनोजकुमार नाले यांच्यासोबत १४ नागरिक गुजरातकडे रवाना झाले. अशा प्रकारे एकूण ५० नागरिकांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश आहे.

नागरिकांच्या प्रवास, निवास आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र समन्वय पथकही तैनात करण्यात आले आहे.

National Unity Day Kevadia Gujarat
Chandrapur News: मावशीला शिवीगाळ केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

राष्ट्रीय एकता परेडच्या मुख्य सोहळ्यापूर्वी हे प्रतिनिधी मंडळ सरदार सरोवर प्रकल्प, एकात्मता संकुल तसेच गुजरातमधील विविध विकास प्रकल्पांना भेट देणार आहे. या माध्यमातून देशातील पायाभूत सुविधा, विकासाची वाटचाल आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

शांततेकडून समृद्धीकडे चंद्रपूरची वाटचाल

एकेकाळी नक्षलवादी हालचालींमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या भागातील नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे, त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे आणि देशाच्या विकासाची भव्यता अनुभवण्याची संधी देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळालेले हे निमंत्रण जिल्ह्यातील शांतता, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाच्या प्रवासाला मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील पावती मानली जात आहे. या सहभागामुळे नागरिकांमध्ये देशाभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.