DJ Ban Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पोळा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश;
DJ Laser Light Restrictions  Chandrapur
DJ Laser Light Restrictions Chandrapur Pudhari
Published on: 
Updated on: 

DJ Laser Light Restrictions Chandrapur

चंद्रपूर : आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट, तीव्र फ्लॅश लाईट तसेच डीजे व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या साउंड सिस्टीमच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ व कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.

लेझर लाईटवर पूर्ण बंदी

मिरवणुकांमध्ये मानवी डोळ्यांवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या लेझर लाईट, तीव्र क्षमतेच्या फ्लॅश लाईट तसेच अन्य धोकादायक प्रकाशयंत्रणांच्या वापरावर पूर्ण बंदी राहणार आहे. पोलीस अधिकारी व सक्षम प्राधिकाऱ्यांना मिरवणुकांमधील प्रकाशयंत्रणांची तपासणी करण्याचे आणि धोकादायक उपकरणे आढळल्यास ती तत्काळ बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

DJ Laser Light Restrictions  Chandrapur
Chandrapur News : उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भूमिपुत्रांचा महामोर्चा स्थगित!

डीजे, वूफर आणि मॉडिफाइड साउंड सिस्टीमला मनाई

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर किंवा अॅम्प्लीफायर वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वूफर, सबवूफर आदी अत्यंत तीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी राहणार आहे.

रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक बंद

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डीजे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विशेष सूट दिलेले दिवस व वेळ याला अपवाद राहतील. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये आदी घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

DJ Laser Light Restrictions  Chandrapur
Chandrapur Bribe News : केवळ ८१ रुपयांच्या लाचेचा मोह नडला, सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात!

नियमभंग केल्यास उपकरणे जप्त

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाशयंत्रणा जप्त केली जाऊ शकते. आयोजक, ऑपरेटर किंवा वाहनचालकाविरुद्ध कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक करण्याची तरतूद असून, संबंधितांविरुद्ध कलम १३४ व १३६ अन्वये न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.

सर्व नागरिक, गणेशोत्सव मंडळे, उत्सव आयोजक आणि संबंधितांनी शासनाच्या नियमांचे पालन करून शांततापूर्ण वातावरणात सण-उत्सव साजरे करावेत आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news