Chandrapur Illegal Sand | बल्लारपूर अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 45.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर पोलिस ठाणे हद्दीत कारवाई; हायवा ट्रकसह 09 ब्रास रेती जप्त, चालक ताब्यात तर मालक फरार
Ballarpur Illegal Sand Transport
रेतीने भरलेला हायवा ट्रक पकडण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले Pudhari
Published on
Updated on

Ballarpur Illegal Sand Transport

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 45 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत रेतीने भरलेला हायवा ट्रक पकडण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर वाहन मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 28 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला बल्लारशहा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा कारवाई केली.

Ballarpur Illegal Sand Transport
Chandrapur Illegal Sand Mining | धानोरा-पिपरी रेतीघाटावर तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई

कारवाईदरम्यान पोलिसांनी (MH 34 CQ 1190) या क्रमांकाचा हायवा ट्रक पकडला. तपासणी केली असता ट्रकमध्ये अंदाजे 09 ब्रास रेती आढळून आली. संबंधित चालकाकडे रेती वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध परवानगी अथवा कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी चालक गणेश शिवाजी कोरपल्लेवार (वय 25) वर्ष, रा. नारपठार, तहसील जिवती, जिल्हा चंद्रपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहन मालक गोपीनाथ राठोड (रा. सारंगापूर, तहसील जिवती, जिल्हा चंद्रपूर) याला पाहिजे आरोपी घोषित करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.

Ballarpur Illegal Sand Transport
Chandrapur Theft Case | डिझेल खरेदीचे पैसे गर्दीत लंपास ; वरोऱ्यात वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबवली

पोलिसांनी कारवाईत अंदाजे 45 लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि 90 हजार रुपये किमतीची 09 ब्रास रेती असा एकूण 45 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 49 बीएनएस, जमीन महसूल कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने केली असून जिल्ह्यात अवैध रेती तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news