Chandrapur Illegal Sand Mining | धानोरा-पिपरी रेतीघाटावर तहसीलदारांची मध्यरात्री धडक कारवाई

नदीपात्रात उतरून दोन ट्रक जप्त; अवैध रेती तस्करीमुळे जिल्ह्यात खळबळ
Dhanora Pipri Sand Ghat Raid
Dhanora Pipri Sand Ghat RaidPudhari
Published on
Updated on

Dhanora Pipri Sand Ghat Raid

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा-पिपरी रेतीघाटावर महसूल विभागाने मध्यरात्री मोठी धडक कारवाई करत अवैध रेती उपसा करणाऱ्या दोन ट्रकांवर कारवाई केली. तहसीलदार विजय पवार यांनी स्वतः नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असताना महसूल विभागाने धानोरा-पिपरी रेतीघाटावर मोठी कारवाई केली. तहसीलदार विजय पवार यांनी मध्यरात्री अचानक छापा टाकत थेट नदीपात्रात सुरू असलेला अवैध रेती उपसा उघडकीस आणला. कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणारे दोन ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतले.

Dhanora Pipri Sand Ghat Raid
Chandrapur Theft Case | डिझेल खरेदीचे पैसे गर्दीत लंपास ; वरोऱ्यात वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबवली

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये MH 40 CQ 7459 आणि MH 34 AB 7955 या क्रमांकाच्या ट्रकांचा समावेश आहे. नायब तहसीलदार धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाहने आशीष कछवा आणि राजू नांदेकर यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्रात थेट ट्रक उतरवून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांतील काही नेते एकत्र येऊन रेती व्यवसायात सक्रिय असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेतेच अवैध वाळू तस्करीच्या मुद्द्यावर मात्र एकत्र असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागील राजकीय पाठबळाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Dhanora Pipri Sand Ghat Raid
Chandrapur collector surprise visit | जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर, साठा रजिस्टरची केली तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद

या कारवाईनंतर परिसरातील शिवनी आणि तामसी रेतीघाटांवरही महसूल विभागाची करडी नजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जिल्ह्यातील इतर महसूल अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारच्या धडक कारवाया करून अवैध रेती तस्करीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news