Chandrapur Theft Case | डिझेल खरेदीचे पैसे गर्दीत लंपास ; वरोऱ्यात वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबवली

सीसीटीव्हीत कैद झालेल्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Warora Theft Case
Warora Theft CaseAAI Image
Published on
Updated on

Warora Theft Case

चंद्रपूर : शेतीसाठी डिझेल खरेदी करण्याच्या उद्देशाने घरातून निघालेल्या एका वृद्ध शेतकऱ्याला वरोरा शहरातील गर्दीचा मोठा फटका बसला. नेहरू चौकातील वाईन शॉपसमोरील गर्दीत संधी साधत एका युवकाने त्यांच्या खिशातून तब्बल ९ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा शहरातील नेहरू चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वामन तुळशीराम धाबेकर  रा. स्नेहांकीत नगर, माढेळी नाका, वरोरा हे शेती व्यवसाय करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी डिझेल खरेदी करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी त्यांनी २४ मे रोजी सायंकाळी घरातून ९ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन बाहेर पडले.

Warora Theft Case
Chandrapur collector surprise visit | जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर, साठा रजिस्टरची केली तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद

दरम्यान, रात्री सुमारे ७.५० वाजताच्या सुमारास ते नेहरू चौकातील निर्वाण वाईन शॉप परिसरात एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी गेले. त्या वेळी दुकानासमोर मोठी गर्दी होती. गर्दीत उभे असताना कोणीतरी आपल्या खिशावर डल्ला मारल्याचे त्यांना सुरुवातीला लक्षातही आले नाही.

काही वेळानंतर खिशात हात घातल्यावर रोकड गायब झाल्याचे लक्षात येताच  त्यांनी तत्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली. उपस्थितांकडे चौकशी केली; मात्र पैशांचा कोणताही मागमूस लागला नाही.

Warora Theft Case
Chandrapur News | राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून संधी बंद?; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटले

यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. फुटेजमध्ये एक युवक गर्दीचा फायदा घेत मागून येताना आणि अत्यंत चलाखीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे काढताना स्पष्टपणे दिसून आला. दुकानातील कर्मचाऱ्याने फुटेजमधील युवकाची ओळख पटवली असून शेतकरी धाबेकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news