नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार चंद्रपूर येथील सिंदेवाडीमध्ये उघडकीस आला आहे. यावरुन सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आकाश टेंभूर्णे (वय.३५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पीडित तरुणी ही सिंदेवाही येथे आपल्या वडीलासोबत राहत होती. बुधवारी (दि.२८) मुलगी घरी न आल्याने वडिलांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी अचानक मुलीचा फोन वडिलांना आला. तिने आपण उमरेड असल्याचे सांगुन मला येथून घेवून जाण्याचे वडीलास सांगितले. यानंतर वडील जावून तिला घेवून आले. यानंतर तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितला. तरुणी व तिचे पालकांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली.
बुधवारी (दि.28) संशयित आरोपी आकाश टेंभूर्णे (वय३५) याने तरुणीला संगणक क्षेत्रात नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले होते. यानंतर आकाश तिला उमरेडला घेवून गेला. तेथे नेवून त्याने तरुणीवर एका लॉजमध्ये अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनंतर तक्रार दाखल करून सिंदेवाही पोलिसांत संशयीत आरोपी आकाश टेंभूर्णे (वय ३५) यांचे विरोधात तक्रार दाखल केली. मात्र आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.