हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
औंढा नागनाथ तालुक्यातील एका तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या (ता. कळमनुरी) येथील एका तरुणासह तिघांवर पोलिस ठाण्यात (शनिवार) गुन्हा दाखल झाला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील एका तरुणीसोबत रामभाऊ नारायण खुडे याने सन 2020 मध्ये ओळख निर्माण केली. त्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर रामभाऊ याने मागील चार वर्षात त्या तरुणीच्या नातेवाईकांकडे येऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तरुणीस बारामती, जाफराबाद व इतर ठिकाणी नेऊन तेथेही अत्याचार केला.
दरम्यान, या घटनेनंतर काही दिवसांपुर्वी रामभाऊ याचा भाऊ माऊली खुडे व वडिल नारायण खुडे यांनी मोबाईलवरून तरुणीशी संवाद साधला. रामभाऊ याची सोयरीक मोडल्याने हुंड्याचे नुकसान झाले असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्या तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यावरून औंढा नागनाथ पोलिसांनी रामभाऊ नारायण खुडे, माऊली नारायण खुडे, नारायण खुडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी या संशयीत आरोपींचा शोध सुरु केला आहे.