

Babupeth smart prepaid meters Issue
चंद्रपूर : चंद्रपूर बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना खुप मोठे वाढीव व अनियमित बिल येत असून जास्तीचे बिलामुळे परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात आले आहे. परंतु काही महिण्यातच ग्राहकांना मोठ्याअवाजवी विज बिल येत आहे. त्यामुळे या संदर्भात आम आदमी पार्टीकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्मार्ट मीटर लावलेल्या प्रत्येक ग्राहकाला पावसाच्या दिवसाचे 4 हजार 5 हजार बिल आले आहे. त्यामुळे गरीब मोलमजुरी करून बिल भरायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच मीटर लावणाऱ्या एजेन्सी कडून ग्राहकाला धमकविण्यात येत आहे, असा आरोपही आम आदमी पार्टीने केला आहे. त्यामुळे ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतरही मिटर बसविणे सुरूच राहिले तर आम आदमी पार्टीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदन देताना आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अनुप तेलतुंबडे, हर्षल नेवलकर, इत्यादी उपस्थित होते.